स्वालिया न. शिकलगार
थंड हवेमुळे सांधे जड वाटू शकतात. उबदार पायघोळ, मोजे, नी-कॅप घाला
सकाळी उठल्यावर गुडघे ताठर वाटल्यास कोमट पाण्याने आंघोळ करा
हलका कोमट शेक द्या. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
आहारात दूध, दही, ताक घ्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा
बाजरी, नाचणीची भाकरी, भिजवलेले बदाम, अक्रोड, तीळ खा
जेवणात हळद, आले वापरा. दिवसभरात कोमट पाणी पित राहा
गुडघे पूर्णपणे स्थिर न ठेवता खुर्चीवर बसून पायांचे हलके व्यायाम करा.
पायऱ्या चढ-उतार करताना रेलिंगचा आधार घ्या
वृद्धांनी घसरू न देणारी चप्पल वापरावी