स्वालिया न. शिकलगार
स्वेटर किंवा वुलन कपडे धुण्यापूर्वी आतून बाहेर (Inside-Out) करा.
यामुळे बाहेरील धाग्यांचे घर्षण कमी होते आणि गोळे तयार होत नाहीत.
अतिगरम पाण्यामुळे लोकरीचे तंतू कमजोर होतात आणि गुंततात.
नेहमी थंड पाण्यात सौम्य लिक्विड डिटर्जंट वापरून हलक्या हाताने धुवा.
धुतल्यानंतर स्वेटर पिळल्यास त्याचा आकार बिघडतो आणि धागे सुटतात.
स्वच्छ सुती टॉवेलमध्ये गुंडाळून अतिरिक्त पाणी शोषून घ्या.
हँगरऐवजी सपाट सुकवा आणि ठेवा
ओले किंवा सुके स्वेटर हँगरला अडकवल्यास वजनाने धागे ताणले जातात.
नेहमी सपाट पृष्ठभागावर सुकवा आणि कपाटात नीट घडी घालून ठेवा.