पुढारी वृत्तसेवा
थंडीत तहान कमी लागते, त्यामुळे पाणी कमी पिऊ नका दिवसाला किमान 2–2.5 लिटर पाणी प्या.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय लावा स्टोन तयार होणारी क्षारं कमी होतात.
मीठ, पापड, फरसाण, लोणचे, रेडीमेड स्नॅक्स कमी खा जास्त मीठामुळे स्टोनचा धोका वाढतो.
चहा-कॉफी मर्यादित प्या कॅफिनमुळे डिहायड्रेशन वाढते.
लिंबू पाणी, संत्रे, मोसंबी यांसारखी सिट्रिक अॅसिड फळे खा हे नैसर्गिकरीत्या स्टोन तयार होणे रोखतात.
हिवाळ्यातही रोज हलका व्यायाम करा यामुळे शरीरातील क्षार आणि युरिक अॅसिडचा समतोल राहतो.
जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ जसे नॉनवेज, अंडी, प्रोटीन पावडर मर्यादित घ्या.
बाथरूम रोखू नका थंडीत अनेकजण बाथरूमला जाणं टाळतात, पण यामुळे स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो.
आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने युरिन रिपोर्ट व किडनी हेल्थ चेकअप करून घ्या.