पुढारी वृत्तसेवा
पाण्याचे कमी सेवन
थंडीत तहान लागणे कमी होते, त्यामुळे लोक दिवसभर पुरेसे पाणी पित नाहीत. पाणी कमी प्यायल्याने मूत्र घट्ट होते आणि त्यामध्ये खनिज पदार्थ साचतात, जे स्टोन तयार करतात.
मूत्र घट्ट होणे (Concentrated Urine)
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास युरिन Thick होते. कॅल्शियम, ऑक्सलेट, यूरिक अॅसिड यामुळे स्टोन होण्याचा धोका जास्त वाढतो.
जास्त खारट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन
हिवाळ्यात चटपटीत, खारट आणि जड पदार्थ जास्त खाल्ले जातात. सोडियमचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोनची शक्यता वाढते.
व्हिटॅमिन D चे कमी प्रमाण
थंडीत सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन D कमी होते. व्हिटॅमिन D कमी झाल्यास कॅल्शियम मेटाबॉलिझम बिघडतो आणि स्टोन तयार होण्याची शक्यता जास्त असते.
शारीरिक हालचाल कमी होणे
थंडीमुळे बरेच लोक व्यायाम कमी करतात. कमी हालचालीमुळे शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे कॅल्शियम युरिनमध्ये जास्त प्रमाणात जाऊन स्टोन तयार होण्यास मदत होते.
जंक फूड आणि गरम-तिखट अन्न सेवन
हिवाळ्यात तळलेले पदार्थ, गोड, तूप यांचे सेवन वाढते. हे पदार्थ किडनीच्या फिल्टरिंगवर परिणाम करतात.
जास्त चहा-कॉफीचे सेवन
थंडीत अनेक लोक दिवसातून 4–5 वेळा गरम चहा-कॉफी पितात. कॅफिनमुळे शरीरातील पाण्याचे नुकसान होते (डिहायड्रेशन) आणि स्टोनची शक्यता वाढते.
मूत्र रोखणे
थंडीत वारंवार बाथरूमला जायची इच्छा टाळली जाते. युरिन जास्त वेळ रोखल्याने त्यातील कण साचतात आणि स्टोन तयार होऊ शकतो.
जास्त प्रोटीनयुक्त आहार
हिवाळ्यात लोक मटण, नॉनवेज, प्रोटीन-युक्त पदार्थ जास्त खातात. अतिप्रमाणात प्रोटीन घेतल्यास यूरिक अॅसिड वाढते आणि स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो.