पुढारी वृत्तसेवा
क्लासिक वाइन ही दोन प्रकाराची असते रेड वाइन आणि व्हाइट वाइन. या दोघांमध्ये फक्त रंग, चव आणि बनवण्याच्या पध्दतीत फरक आहे.
वाइन साठी द्राक्ष प्रोसेस करताना त्याची साल वेगळी केली. ज्यामुळे त्याला पिवळट सोनेरी रंग येतो आणि त्याची चव फ्रेश आणि क्रिस्पीसर होते.
रेड वाइन तयार करताना त्याच्या प्रोसेसिंग मध्ये द्राक्ष हे साली आणि बिंयाण सकट वापरले जातात. ज्यामुळे त्याला लाल आणि जांभळट रंग येतो आणि त्याची चव तिखट मातीसारखी किंवा मसालेदार असते.
फ्रुट आणि क्तासिक वाइन मधला मुख्य फरक हा आहे की क्लासिक वाइन बनवताना फक्त द्रांक्षाचा तर फ्रुट वाइन बनवताना वेगवेगळ्या फळांचा उपयोग केला जातो.
क्तासिक वाइन थोडिशी तिखट आणि क्रिस्पी असते तर फ्रुट वाइनची चव ही मुख्यता फळांची असते.
फ्रुट वाइन ही अल्कोहोलिक असते. दोघांन मध्ये अल्कोहोलची मात्रा ही जवळपास एक सारखी असते. क्लासिक वाइनची ८ ते १५ टक्के तर फ्रुट वाइनची ८ ते १४ टक्के.
फ्रुट वाइन आणि क्लासिक वाइन बनवण्याची पध्दत ही एक सारखी आहे. त्या दोघांन मध्ये वेगळी अल्कोहोल मिसळली जात नाही.
फ्रुट वाइन साठी ब्ल्यू बेरी, स्ट्रोबेरी, सफरचंद, अननस आणि अजून नेगनेगळ्या फळांचा वापर करुन क्लासिक वाइनच्या पध्दतीने तयार केली जाते.
व्हाइट आणि फ्रुट वाइन सर्व करण्याच्या २० मिनिटांआधी फ्रिज मधुन बाहेर काढली जाते तर रेड वाइन सर्व करण्याच्या २० मिनिटा आधी फ्रिज मध्ये ठेवली जाते.