पुढारी वृत्तसेवा
थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो.
रक्तदाब अचानक वाढतो
हिवाळ्यात शरीर उष्णता टिकवण्यासाठी जास्त मेहनत करते, यामुळे बीपी वाढून हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो.
रक्त घट्ट (Thick) होते
थंडीत शरीरातील रक्त अधिक घट्ट होते, ज्यामुळे क्लॉट (गाठ) होण्याची शक्यता वाढते.
सकाळी हार्ट अॅटॅकचा धोका जास्त
थंड सकाळी उठल्यावर बीपी व हार्ट रेट अचानक वाढतो, त्यामुळे पहाटे हार्ट अॅटॅकचे प्रमाण जास्त दिसते.
व्यायाम आणि हालचाल कमी होते
थंडीमुळे लोक आळशी होतात, चालणे-व्यायाम कमी होतो, ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते.
जड व तेलकट आहार वाढतो
हिवाळ्यात तूप, तळलेले पदार्थ, मांसाहार जास्त खाल्ला जातो, ज्यामुळे हृदयावर परिणाम होतो.
श्वसन संसर्गाचा परिणाम हृदयावर
सर्दी, खोकला, फ्लू यामुळे शरीरात सूज (Inflammation) वाढते, जी हार्ट अॅटॅकला कारणीभूत ठरू शकते.
थंडीत पाणी कमी पिण्याची सवय
डिहायड्रेशनमुळे रक्त जाड होते आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो.
आधीच हृदयरोग असलेल्यांना धोका जास्त
डायबिटीज, बीपी, कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांनी थंडीत विशेष काळजी घ्यावी.