Winter Diet Tips | हिवाळ्यात फिट राहायचंय; ‘हे’ पदार्थ आत्ताच टाळा

पुढारी वृत्तसेवा

आपल्याला हिवाळा ऋतू आवडतो आणि तो एन्जॉय करायलाही आवडतो

हिवाळ्यात आजारपणाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाणे महत्त्वाचे ठरते

हिवाळ्यात फिट राहण्यासाठी काही पदार्थ खाण्याचे टाळणेही गरजेचे असते. चला तर जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहेत

केळी हा ‘थंड’ प्रकृतीचा पदार्थ असल्याने हिवाळ्यात त्याचे सेवन आरोग्यासाठी फारसे योग्य नाही. त्यामुळे खोकला, घसा दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात

संत्रा, लिंबू यासारखी सायट्रस फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र हिवाळ्यात त्यांचे अति प्रमाणात सेवन करणे टाळावे

हिवाळ्यात आपण चहा आणि कॉफीचे सेवन अधिक करतो. मात्र जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) निर्माण होऊ शकते

अतिशय तेलकट व तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरते. यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते

हिवाळ्यात अधिक प्रमाणात मद्यपान केल्यास शरीराची आजारांशी लढण्याची ताकद कमी होते. त्यामुळे या काळात आजार पटकन जडण्याची शक्यता वाढते

नारळपाणी हे शरीराला थंडावा देणारे व हायड्रेट ठेवणारे पेय आहे. मात्र हिवाळ्यात त्याचे अति सेवन केल्यास पचनाच्या तक्रारी, खोकला तसेच ताप येण्याची शक्यता असते

येथे क्लिक करा