Alum Benefits : तुरटीचा 'या' ५ प्रकारे वापर करा; अनेक समस्यांपासून मिळेल आराम

अविनाश सुतार

अवघ्या १० रुपयांत सहज बाजारात मिळणारी तुरटी (अलम) शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते

वाढत्या वयातील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुरटीचा वापर फायदेशीर ठरतो

जखमेतील आणि दाढी करताना होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तुरटीचा वापर Antiseptic म्हणून करता येतो

तुरटीचे रासायनिक नाव “पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट” असे आहे. तुरटीमध्ये जंतुनाशक, बुरशीविरोधी, निर्जंतुकीकरण करणारे आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात

तोंडातून दुर्गंधी येत असेल, तुरटीची पावडर पाण्यात मिसळून गुळण्या करा. तोंडातील जंतू नष्ट होतील. तुरटीचा नैसर्गिक माउथवॉश म्हणूनही वापर करू शकता

परफ्युम जास्त काळ टिकण्यासाठी स्प्रे करण्याआधी त्या भागावर आधी तुरटी चोळा. यामुळे परफ्युमचा सुगंध जास्त वेळ टिकतो आणि घामाचा वासही कमी होईल

तुरटीचा वापर नैसर्गिक डिओडरंट म्हणून करता येतो. रासायनिक परफ्युम टाळायचा असेल तर रोज तुरटीचा वापर करू शकता

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीची पावडर नारळाच्या तेलात मिसळून पायांना लावा. भेगा लवकर भरून येऊन त्वचा मऊ होते

त्वचा नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात तुरटीची पावडर मिसळून आंघोळ करा. यामुळे शरीरावरील घाण व मैल निघून जाण्यास मदत होते

येथे क्लिक करा