Winter Hair Care : महागड्या हेअर स्पाची गरज नाही! घरगुती हेअर मास्कने मिळवा मऊ आणि चमकदार केस

Asit Banage

हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन केस रुक्ष होतात.

केस धुण्यासाठी अतिगरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा.

आठवड्यातून दोनदा खोबरेल, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईलने केसांना हलक्या हाताने मालिश करावी.

प्रत्येक वेळी शॅम्पू केल्यानंतर केसांच्या लांबीवर कंडिशनर लावावे.

दूध-मध, दही-मध आणि कोरफड-खोबरेल तेल यांसारखे घरगुती हेअर मास्क वापरता येतात.

ओले केस टॉवेलने जोरात घासण्याऐवजी मायक्रोफायबर टॉवेलने हलक्या हाताने टिपावेत.

बाहेर जाताना केसांना थंड वाऱ्यापासून वाचवण्यासाठी रेशमी किंवा सॅटिन स्कार्फचा वापर करावा.

आहारात अक्रोड, जवस, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि पुरेशा पाण्याचा समावेश करावा.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...