Touch Wood Tradition : 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? कारण जाणून घ्या...

Asit Banage

'टच वुड' ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा असून चांगली बातमी सांगताना किंवा इच्छा व्यक्त करताना लाकडाला स्पर्श केला जातो.

आध्यात्मिक मान्यतेनुसार, झाडे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि लाकूड संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.

लाकडाचा संबंध पंचतत्त्वांपैकी पृथ्वी तत्त्वाशी जोडला जातो. पृथ्वी तत्त्व स्थिरता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.

प्राचीन सेल्टिक आणि निसर्गपूजक संस्कृतींमध्ये झाडांमध्ये देव किंवा पवित्र आत्म्यांचा वास असल्याची श्रद्धा होती.

झाडाच्या लाकडाला स्पर्श करणे म्हणजे दैवी शक्तीकडून संरक्षण मागणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे, अशी धारणा होती.

पाश्चात्य ख्रिश्चन परंपरेत लाकडी क्रॉसच्या पवित्रतेशीही 'टच वुड' किंवा 'नॉक ऑन वुड' या प्रथेचा संबंध जोडला जातो.

भारतातही पिंपळ, वड आणि तुळस यांसारख्या वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून 'टच वुड' ही अनिश्चित परिस्थितीत मनाला दिलासा देणारी आणि चिंता कमी करण्यास मदत करणारी कृती मानली जाते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...