पुढारी वृत्तसेवा
आजकाल फिट दिसणाऱ्यांनाही अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो; शरीरात लपून राहिलेली हृदयविकाराची सुप्त लक्षणे हे त्यामागील एक प्रमुख कारण मानले जाते.
आपले शरीर उच्च-तीव्रतेच्या कसरतीसाठी कितपत तयार आहे, याचा नेमका अंदाज घेण्यासाठी जिममध्ये जाण्यापूर्वी काही मूलभूत तपासण्या करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे त्यांनी पुढील तपासण्या नक्की कराव्यात.
ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) या चाचणीद्वारे हृदयाचे ठोके व विद्युत लहरी तपासल्या जातात; लयीतील बिघाड समजण्यास ही चाचणी उपयुक्त आहे.
TMT (ट्रेडमिल टेस्ट / स्ट्रेस टेस्ट) चाचणीमुळे व्यायाम आणि ताणतणावादरम्यान हृदय कशाप्रकारे कार्य करते, याचे मूल्यांकन करता येते.
लिपिड प्रोफाइल व HbA1c मधून कोलेस्ट्रॉल आणि तीन महिन्यांतील साखर कळून डायबिटीज व मेटाबॉलिक धोके समजतात.
Hs-CRP व ESR मुळे शरीरातील सूज आणि धमन्यांतील प्लाकचा धोका समजतो, अगदी कोलेस्ट्रॉल सामान्य असले तरीही.
या चाचण्या केवळ औपचारिकता नसून सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जीम सुरु करण्यापूर्वी नक्की करुन घ्या.