पुढारी वृत्तसेवा
संत्रं – व्हिटॅमिन C चा खजिना
संत्र्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, जे कोलेजन वाढवून त्वचेला नैसर्गिक ग्लो देते.
डाळिंब – त्वचेसाठी अमृत
डाळिंब रक्तशुद्धी करते, त्वचेवरील कोरडेपणा कमी करते आणि गुलाबी चमक आणते.
सफरचंद – रोज एक तरी खा
सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवतात आणि सुरकुत्या लवकर येऊ देत नाहीत.
पपई – त्वचा आतून स्वच्छ
पपई पचन सुधारते, टॉक्सिन्स बाहेर टाकते आणि त्वचा स्वच्छ व मऊ बनवते.
कीवी – ड्राय स्किनसाठी वरदान
कीवीमधील व्हिटॅमिन E आणि C थंडीत होणारी त्वचेची कोरडी समस्या कमी करतात.
केळी – नैसर्गिक मॉइश्चरायझर
केळी त्वचेला आतून पोषण देते आणि थंडीत होणारी ड्रायनेस कमी करते.
स्ट्रॉबेरी – अँटी एजिंग फळ
स्ट्रॉबेरी त्वचेवरील डाग कमी करते आणि त्वचेला तरुण ठेवते.
ऋतूनुसार फळे खाणे महत्त्वाचे
हिवाळ्यात मिळणारी ताजी फळे त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरतात.
पाणी आणि फळांची जोडी हवीच
फळांसोबत पुरेसे पाणी प्याल्यास त्वचा अधिक टवटवीत राहते.