पुढारी वृत्तसेवा
पोहे म्हणजे काय?
तांदळापासून बनलेले पोहे हलके, पटकन पचणारे आणि लोकप्रिय भारतीय नाश्ता आहेत.
कॅलरीज कमी असतात
साध्या पोह्यांमध्ये कॅलरीज तुलनेने कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते योग्य ठरू शकतात.
पचनासाठी हलके
पोहे सहज पचतात, त्यामुळे गॅस, अॅसिडिटी किंवा जडपणाची समस्या होत नाही
फायबर वाढवता येतो
भाज्या, शेंगदाणे, वाटाणे घातल्यास फायबर वाढते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.
भूक नियंत्रणात राहते
फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमुळे वारंवार भूक लागत नाही.
कसा बनवता यावर परिणाम अवलंबून
जास्त तेल, साखर, बटाटा किंवा फरसाण घातल्यास पोहे वेटलॉससाठी अपायकारक ठरू शकतात.
सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य
तज्ञांच्या मते पोहे सकाळी किंवा वर्कआउटनंतर खाल्ले तर अधिक फायदेशीर ठरतात
प्रोटीनची जोड महत्त्वाची
दही, उकडलेली कडधान्ये किंवा पनीर घातल्यास पोह्यांचा पोषणमूल्य वाढतो.
मर्यादित प्रमाण गरजेचे
पोहे आरोग्यदायी असले तरी अति सेवन केल्यास वजन वाढू शकते