थंडीत त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! वापरा 9 जबरदस्त मॉइश्चरायझिंग फेसपॅक

पुढारी वृत्तसेवा

दही आणि मध पॅक: 2 चमचे दही आणि 1 चमचा मध मिसळा.

फायदा: त्वचा एक्सफोलिएट होते आणि दीर्घकाळ ओलावा टिकतो.

केळीचा फेस मास्क: अर्धी पिकलेली केळी आणि 1 चमचा दूध/साय एकत्र करून लावा. फायदा: कोरड्या त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर.

बेसन आणि हळद पॅक: 1 चमचा बेसन, हळद आणि दूध/दही मिसळा.

फायदा: टॅनिंग कमी होते आणि नैसर्गिक चमक येते.

पपई आणि मध पॅक: 2 चमचे पपईचा गर आणि 1 चमचा मध लावा.

फायदा: मृत पेशी काढल्या जातात आणि आर्द्रता टिकून राहते.

Face Bleach Side Effects | Canva

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी: 1 चमचा ग्लिसरीन आणि २ चमचे गुलाब पाणी एकत्र करा. फायदा: प्रभावी टोनर म्हणून काम करते, त्वचा हायड्रेटेड राहते.

Monsoon Skincare For Oily Skin | Canva

ओटमील आणि दुधाचा स्क्रब: 1 चमचा ओटमील आणि 2 चमचे कच्चे दूध मिसळून स्क्रब करा.

फायदा: मृत त्वचा हलक्या हाताने साफ होते आणि त्वचा मुलायम होते.

बदाम तेल आणि अंड्याचा पिवळा भाग: 1 अंड्याचा पिवळा भाग आणि 1/2 चमचा बदाम तेल लावा.

फायदा: अतिशय कोरड्या त्वचेसाठी पौष्टिक पॅक.

Homemade Face Scrub | Canva

चंदन आणि संत्र्याचा रस: चंदन पावडरमध्ये संत्र्याच्या रसाचे काही थेंब मिसळून लावा. फायदा: चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि रंगत सुधारते.

ॲलोव्हेरा (कोरफड) जेल पॅक: शुद्ध ॲलोव्हेरा जेल आणि चिमूटभर हळद एकत्र करून लावा.

फायदा: त्वचेची जळजळ कमी होते आणि ओलावा टिकून राहतो.

instagram photo
येथे क्लिक करा...