पुढारी वृत्तसेवा
थंडीमध्ये घाम कमी येतो म्हणून तहान कमी लागते, पण शरीरातील पेशींना पाण्याची गरज तितकीच असते.
हिवाळ्यातील ड्राय एअर त्वचा, ओठ आणि नाकाच्या आतील भागातील ओलावा कमी करते, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
थंडीत शरीर तापमान राखण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करते, त्यामुळे शरीरातील पाणी जलद खर्च होतं.
हिवाळ्यात अनेकजण गरम पेय जास्त पितात, पण त्यातील कॅफिन शरीरातील पाणी कमी करते.
सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण संतुलित नसेल तर डिहायड्रेशनची लक्षणं दिसू शकतात.
गाजर सूप, टोमॅटो सूप, संत्रे, मोसंबी, डाळिंब ही खाद्यपदार्थ शरीरातील पाणी टिकवून ठेवतात.
थंडीत लोक पाणी कमी पितात, त्यामुळे कोमट पाणी प्यायल्याने हायड्रेशन सोपं होतं.
ओठ फाटणे, त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांत कोरडेपणा हे पाणी कमी असल्याची चेतावणी देतात.
काकडी, तरबूज, नारळपाणी, ताक, सूप, चिकन ब्रॉथ शरीराला सतत हायड्रेट ठेवतात.