थंडीत केसात अधिक कोंडा होतोय, जाणून घ्या कारण अन् उपाय काय

पुढारी वृत्तसेवा

हिवाळा सुरू होताच केसांत कोंडा (Dandruff) होण्याची समस्या वाढते. उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीत हे प्रमाण जास्तच वाढते?

हिवाळ्यात हवेतील आर्द्रता (Moisture) खूप कमी असल्याने त्वचा , टाळू (Scalp) कोरडी पडते. कोरड्या टाळूमुळे मृत त्वचा पांढऱ्या खपल्यांच्या स्वरूपात बाहेर पडते, ज्याला आपण कोंडा म्हणतो.

गरम पाण्याचा अतिवापर

कडाक्याच्या थंडीत आपण गरम पाण्याने अंघोळ करतो. पण अति गरम पाणी केसांच्या मुळांमधील नैसर्गिक तेल (Sebum) काढून टाकते. यामुळे टाळू अधिक कोरडी होऊन कोंड्याची समस्या वाढते.

डोके कमी वेळा धुणे

थंडीमुळे अनेकजण वारंवार केस धुणे टाळतात. केस स्वच्छ न धुण्यामुळे टाळूवर घाण, घाम आणि तेल साचते. यामुळे 'मेलेसेझिया' (Malassezia) नावाच्या बुरशीची (Fungus) वाढ होते आणि कोंडा वाढतो.

आहारातील बदल

हिवाळ्यात आपण अनेकदा तळलेले किंवा गोड पदार्थ जास्त खातो. आहारात व्हिटॅमिन बी, झिंक आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडची कमतरता असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे कोंडा होऊ शकतो.

'मॅलेसेझिया' बुरशीचा प्रभाव

आपल्या टाळूवर नैसर्गिकरित्या ही बुरशी असते. पण जेव्हा टाळूवर तेल जास्त साचते, तेव्हा ही बुरशी वेगाने वाढते. थंडीत डोके झाकून ठेवल्याने (टोपी किंवा स्कार्फमुळे) तिथे उष्णता निर्माण होते, जी या बुरशीसाठी पोषक ठरते.

मानसिक ताण आणि झोप

कदाचित तुम्हाला ऐकून नवल वाटेल, पण हिवाळ्यातील 'सीझनल स्ट्रेस' आणि अपुरी झोप यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याचा थेट परिणाम त्वचेवर होतो आणि कोंड्याची समस्या बळावते.

काय उपाय कराल?

कोमट पाण्याचा वापर करा.

केसांना नैसर्गिक तेलाने मसाज करा.

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

योग्य अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरा.

येथे क्लिक करा...