पुढारी वृत्तसेवा
जेवणानंतर शरीरातील रक्तप्रवाह पचनक्रियेसाठी पोटाकडे वळतो. मात्र, अंघोळीमुळे हा प्रवाह शरीराच्या इतर भागांकडे विभागला जातो, ज्यामुळे पचन मंदावते.
अन्नाचे पचन होण्यासाठी शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण होणे आवश्यक असते. अंघोळ केल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होते, ज्याचा परिणाम पचनावर होतो.
जेवणानंतर लगेच अंघोळ केल्याने पोटात गॅस, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
अंघोळ करताना त्वचेचे तापमान नियंत्रित करण्यासाठी रक्ताचा पुरवठा त्वचेकडे जास्त होतो, यामुळे पचनसंस्थेला मिळणाऱ्या रक्ताचे प्रमाण कमी होते.
पचन नीट न झाल्यामुळे अन्नातील पोषक घटकांचे शोषण होत नाही आणि चयापचय क्रिया मंदावते, यामुळे वजन वाढू शकते.
अन्नाचे पचन योग्य रितीने न झाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याऐवजी उलट थकवा आणि आळस जाणवू लागतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवण आणि अंघोळ यामध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.
नेहमी जेवणापूर्वी अंघोळ करणे उत्तम, जेणेकरून शरीर फ्रेश राहील आणि पचनक्रिया विनाअडथळा पार पडेल.