Mind & Brain Health |केवळ ७ दिवसांच्या 'ध्याना'मुळे बदलू शकते मेंदूची कार्यक्षमता!

पुढारी वृत्तसेवा

ध्यानाचा केवळ ७ दिवस नियमित सराव केल्यास मेंदूची पुनर्रचना करू शकते, असा दावा ताज्या संशोधनात करण्यात आला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठ (सॅन दिएगो) येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, एक आठवडा गाढ ध्यान केल्याने मेंदूची कार्यक्षमतेमध्‍ये सकारात्मक बदल दिसून आले.

हे संसोधन 'कम्युनिकेशन्स बायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

सलग सात दिवस ध्‍यान केल्‍याने मेंदूची लवचिकता, चयापचय क्रिया, रोगप्रतिकारक शक्ती आणि वेदना निवारण करणाऱ्या नैसर्गिक यंत्रणा सक्रिय होतात.

संशोधनाचे मुख्य लेखक डॉ. हेमल पटेल यांच्या मते, " ध्‍यानामुळे मेंदू वास्तवाकडे ज्या पद्धतीने पाहतो, त्या पद्धतीतच मूलभूत बदल होतो. "

ध्यानामुळे मेंदूतील जोडणी अशा प्रकारे बदलते, जी सामान्यतः औषधांच्या प्रभावाखाली दिसून येते."

भारतातील वाढत्या मानसिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

दैनंदिन जीवनात धान्‍याचा समावेश केल्यास मेंदूची कार्यक्षमतेबरोबर जीवनाचा दर्जाही उंचावण्यास मदत होईल, असे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

येथे क्‍लिक करा.