पुढारी वृत्तसेवा
गरम पदार्थ वर्तमानपत्रात ठेवता?
तुमची ही सवय आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक!
अनेक घरांमध्ये हीच पद्धत!
गरम पोळ्या किंवा पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळल्या जातात किंवा त्यावर ठेवल्या जातात.
शाईचा होऊ शकतो अन्नाशी संपर्क!
वर्तमानपत्रातील छपाईची शाई पदार्थंना लागून तिच्यात मिसळू शकते.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
शाईतील काही हानिकारक घटक शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
पोटाच्या तक्रारींचा धोका!
अस्वच्छ वर्तमानपत्राच्या संपर्कामुळे पदार्थ दूषित होण्याची शक्यता असते.
लहान मुलांसाठी घ्या विशेष काळजी
मुलांना अन्न देताना स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे लक्ष द्या.
FSSAI काय सांगते?
अन्न गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करु नये.
मग पदार्थ ठेवायचा कुठे?
स्वच्छ स्टीलचा डबा किंवा झाकण असलेले स्वच्छ भांडे वापरा.
ही छोटी सवय आजच बदला!
वर्तमानपत्रात पदार्थ ठेवणे टाळा; कारण यामुळे आरोग्याचा धोका वाढू शकतो.