पुढारी वृत्तसेवा
मिठाईपासून ते चविष्ट आणि रुचकर पदार्थांचा सुगंध आणि स्वाद वाढवण्यासाठी वेलची (इलायची) प्रत्येक घरातील मसाल्याच्या डब्यात आढळून येते
वैदिक ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या परंपरांनुसार, वेलचीला (इलायची) सात्त्विक मसाला मानले जाते
वेलची (इलायची) मध्ये संरक्षण, उपचार आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता असल्याचे फार कमी लोकांना माहीत आहे
वेलची आपल्या जीवनात संरक्षण आणि समृद्धी आणू शकते, असा आध्यात्मिक परंपरांमध्ये विश्वास असल्य़ाने घराबाहेर पडण्यापूर्वी खिशात वेलची ठेवण्याचा सल्ला दिला जातो
वेलचीचा संबंध शुक्र आणि बुध या ग्रहांशी जोडला जातो. विविध धार्मिक विधी आणि आध्यात्मिक प्रथांमध्ये संरक्षण, उपचार आणि अनिष्ट घटना टाळण्यासाठी वापर केला जातो
वेलचीच्या शुद्धीकरण करणाऱ्या गुणधर्मांमुळे आभामंडलाचे संतुलन राखण्यास आणि बुद्धी अधिक तीक्ष्ण होण्यास मदत होते, असा आध्यात्मिक समज आहे
आर्थिक प्रगतीला चालना देते, आत्मविश्वास वाढतो, लोकांशी संवाद सुलभ होतो आणि अनपेक्षित चांगल्या संधी मिळू शकतात, असे मानले जाते
बाहेर पडताना वेलची खिशात ठेवल्याने व्यावसायिक कामकाजात विश्वासू व्यक्ती ओळखण्यास आणि फसवणुकीच्या प्रसंगांपासून दूर राहण्यास मदत होते, असा समज आहे
वेलची खिशात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, ग्रहदोष टळतात किंवा आर्थिक प्रगती होते, याला वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. हे दावे वैदिक ज्योतिष आणि आध्यात्मिक परंपरांवर आधारित आहेत