Short Video: रील्स पाहताना आपण थांबत का नाही? सतत स्क्रोलिंगमागचं कारण काय?

पुढारी वृत्तसेवा

रील्स स्क्रोल करताना वेळ जास्त जातो

Instagram किंवा YouTube Shorts उघडलं की तास कधी निघून जातो कळतही नाही. यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या.

रील्सच व्यसन

प्रत्येक व्हिडिओ संपताच पुढचा व्हिडिओ आपोआप सुरू होतो. यामुळे मेंदूला थांबण्याची संधीच मिळत नाही आणि स्क्रोलिंग सुरूच राहतं.

डोपामिनचा खेळ

प्रत्येक मजेदार, आश्चर्यकारक किंवा भावनिक व्हिडिओ मेंदूत डोपामिन नावाचं रसायन सक्रिय करतो. यामुळे पुढचा व्हिडिओ आणखी चांगला असेल, अशी अपेक्षा कायम राहते.

प्रत्येक Swipe म्हणजे नवीन सरप्राईज

कधी विनोद, कधी ट्रॅव्हल, कधी रेसिपी, कधी मोटिवेशन... प्रत्येक Swipe वर नवीन कंटेंट मिळत असल्याने मेंदू सतत उत्सुक राहतो.

लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते?

तासन्तास रील्स पाहण्याची सवय लागल्यावर पुस्तक वाचणं, अभ्यास करणं किंवा लांब व्हिडिओ पाहणं कंटाळवाणं वाटू शकतं. तज्ज्ञांच्या मते, मेंदू वेगवान माहितीची सवय लावून घेतो.

'ब्रेन रॉट' म्हणजे काय?

रील्स पाहिल्यानंतर थकवा, लक्ष न लागणं किंवा काहीच आठवत नसल्यास अनेकजण त्याला 'Brain Rot' म्हणतात. ही वैद्यकीय समस्या नसली तरी मानसिक थकव्याची भावना खऱ्या अर्थाने जाणवू शकते.

कंटाळा सहन करण्याची क्षमता कमी होते

पूर्वी रिकाम्या वेळेत लोक विचार करत, निरीक्षण करत किंवा शांत बसत. आता ३० सेकंद मोकळा वेळ मिळाला तरी हात आपोआप मोबाईलकडे जातो.

स्क्रोलिंग सुरूच का राहतं?

अनेकदा रील्स पाहण्यात आनंदही वाटत नाही, तरीही आपण स्क्रोल करत राहतो. कारण मेंदू पुढच्या "बेस्ट व्हिडिओ"च्या शोधात असतो.

रील्स वाईटच आहेत का?

अजिबात नाही. यातून भाषा, फिटनेस, करिअर टिप्स आणि अनेक उपयुक्त गोष्टी काही सेकंदांत शिकता येतात. समस्या कंटेंटमध्ये नाही, तर त्यावर घालवलेल्या वेळेत आहे.

स्क्रोलिंगवर नियंत्रण कसं ठेवायचं?

स्क्रीन टाइम मर्यादा ठेवा, मध्येच ब्रेक घ्या, पुस्तकं, पॉडकास्ट आणि लांब व्हिडिओंसाठी वेळ द्या, झोप, व्यायाम आणि कुटुंबासाठी वेळ राखून ठेवा.

जेवणानंतर किती वेळाने चालायला पाहिजे? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

येथे क्लिक करा