पुढारी वृत्तसेवा
जेवण झाल्यावर लगेच चालणे योग्य आहे का?
वजन कमी करायचे असेल, साखर नियंत्रणात ठेवायची असेल आणि पचन सुधारायचे असेल तर हा सल्ला नक्की वाचा.
जेवणानंतर चालणे फायदेशीर ठरू शकते
तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर थोडं चालल्याने पचन सुधारते आणि शरीर अधिक सक्रिय राहते.
किती वेळाने चालायला सुरुवात करावी?
जेवण झाल्यानंतर 10 ते 30 मिनिटांच्या आत 10 ते 15 मिनिटे थोडं चालणं फायदेशीर मानलं जातं.
वजन कमी करण्यास कशी मदत होते?
जेवणानंतर चालल्याने शरीरातील ग्लुकोज स्नायूंमध्ये ऊर्जा म्हणून वापरला जातो, त्यामुळे अतिरिक्त कॅलरी साठत नाहीत.
ब्लड शुगर नियंत्रणात राहते
जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. मधुमेहींसाठी हे विशेष फायदेशीर ठरू शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त
नियमित चालण्यामुळे रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
किती वेळ चालावे?
दररोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे चालणे पुरेसे आहे.
जेवणानंतर काय टाळावे?
जेवण होताच धावणे, जॉगिंग करणे किंवा जोरदार व्यायाम करणे टाळावे. यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो.
अति जेवण केले असेल तर सावध!
खूप जास्त जेवण केल्यानंतर लगेच चालल्यास अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो.
आरोग्याचा सोपा मंत्र
जेवणानंतर 10-15 मिनिटं चालल्याने वजन नियंत्रणात राहतं, चांगलं पचन होतं, साखर नियंत्रणात राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
टीप
कोणताही आरोग्यविषयक त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दिनचर्येत बदल करा.