Female Biological Advantages: महिला पुरूषांपेक्षा जास्त का जगतात...?

Anirudha Sankpal

जागतिक सरासरीनुसार, महिला पुरुषांच्या तुलनेत साधारणपणे ५ वर्षे जास्त जगतात असे विज्ञानाचे सांगणे आहे.

महिला दीर्घायुषी असण्यामागे महिला आणि पुरुषांची जैविक रचना (Biological Structure) प्रामुख्याने कारणीभूत आहे.

पुरुषांच्या खाण्यापिण्याच्या सवयी महिलांपेक्षा कमी सकस असतात आणि ते आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाणे टाळतात.

पुरुष त्यांच्या जीवनशैलीमध्ये धूम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या आयुष्य कमी करणाऱ्या सवयींना जास्त बळी पडतात.

Smoking | Pudhari

जीवनशैली बदलली तरीही जैविक फरकांमुळे स्त्री आणि पुरुषांच्या आयुर्मानातील हा अंतर पूर्णपणे संपणार नाही.

महिलांच्या शरीरात असणारा 'एस्ट्रोजन' (Estrogen) हा सेक्स हार्मोन त्यांच्या आरोग्यासाठी संरक्षकासारखे काम करतो.

एस्ट्रोजन हार्मोनमुळे महिलांमधील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि त्यांच्या हाडांचे व मेंदूचे रक्षण होते.

Superfoods for women

पुरुषांमध्ये असणारा 'टेस्टोस्टेरोन' (Testosterone) हा हार्मोन त्यांना जास्त जोखीम किंवा धोके पत्करण्यास प्रवृत्त करतो.

gym timing | pudhari photo

पुरुषांची जैविक रचना त्यांना मृत्यूसाठी अधिक संवेदनशील बनवते, तर महिलांची जैविक रचना त्यांना अपंगत्वासाठी संवेदनशील बनवते.

केवळ मानवच नाही तर प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्येही मादीचे आयुष्य नरापेक्षा जास्त असते, मात्र पक्ष्यांमध्ये याच्या उलट पाहायला मिळते.

Black Tiger | pudhari photo
येथे क्लिक करा