Namdev Gharal
आपण पाठ दुखत असल्यावर, पाय मुरगळल्यावर, मुका मार लागल्यावर गरम किंवा थंड पाण्याचा शेक घेत असतो. पण कोणत्या दुखण्यासाठी कोणता शेक घ्यावा हे माहिती असणे गरजेच असते
थंड शेक कधी वापरावा?
ताजी जखम किंवा दुखापत: पडल्यामुळे किंवा लागल्यामुळे लगेच आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी थंड शेक (बर्फाचा शेक) सर्वोत्तम मानला जातो
अचानक आलेली सूज : मुका मार लागणे, पाय मुरगळणे किंवा मोच येणे यावर लगेच बर्फाने शेकावे. त्यामुळे वेदना कमी होऊन बरे वाटू लागते
डोकेदुखी किंवा मायग्रेन: कपाळावर किंवा मानेच्या मागे थंड पट्टी ठेवल्याने मायग्रेनच्या वेदनांमध्ये त्वरित आराम मिळतो
एखादा डास किंवा किटक चावला किंवा खाज सूटत असल्यास त्या जागेवर बर्फ लावल्यास खाज व जळजळ थांबते
गरम शेक कधी वापरावा?
जुनाट वेदनाः दीर्घकाळापासून असणारी पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानदुखी यावर गरम पाण्याचा शेक खूप फायदेशीर ठरतो
स्नायू आखडल्यास : चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे किंवा बसल्यामुळे स्नायू आखडल्यास गरम शेकमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायू मोकळे होतात
संधिवात सांधेदुखी आणि सांधे आखडण्याच्या समस्येवर गरम शेक दिल्याने आराम मिळतो आणि हालचाल करणे सोपे होते
मासिक पाळीतील वेदना (Period Cramps): मासिक पाळी दरम्यान पोटात आणि कंबरेत येणाऱ्या पेटक्यांवर गरम पाडण्याची पिशवी (Heating Bag) ठेवल्याने लगेच आराम मिळतो.
थंड शेकचा नियम: ताजी जखम किंवा सूज आल्यानंतर पहिल्या २४ ते ४८ तासांत फक्त 'थंड' शेक द्यावा. तसेच कोणताही शेक एका वेळी १५ ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ नये.
गरम शेकचा नियम: ताज्या जखमेवर किंवा जिथे रक्तस्त्राव होत आहे, तिथे कधीही गरम शेक देऊ नये. यामुळे सूज वाढू शकते.
दुसरी गोष्ट म्हण्जे थंड शेक घेताना बर्फ थेट त्वचेवर लावू नका, तो नेहमी कापडात गुंडाळून वापरावा. तसेच गरम पाण्याचा शेक घेताना पाणी जास्त कडक नसावे, जेणेकरून त्वचा भाजणार नाही.