Wari and Tulsi Vrindavan|वारीमध्ये महिला डोक्यावर तुळस घेऊन का चालतात? जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूरच्या वारीत डोक्यावर तुळशीचे वृंदावन का घेतले जाते, यामागील काही खास गोष्टी वाचा

वारीत मैलोन् मैल चालणाऱ्या महिला वारकऱ्यांची जिद्द, भक्ती थक्क करणारी आहे

ही तुळस केवळ वनस्पती नाही, तर ती पावित्र्य आणि समर्पणाचे प्रतीक मानली जाते

वारीत एकमेकांच्या पाया पडण्याची, 'माऊली' म्हणण्याची ही अप्रूप संस्कृती आहे

तसेच शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या तुळशीचे महत्व अपार आहे

तुळशीमध्ये नैसर्गिकरीत्या अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे जंतू संसर्गापसून बचाव करतात

डोक्यावर तुळस वाहणे म्हणजे आपला अहंकार विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणे होय

लहान मुलींपासून ते वृद्धांपर्यंत, महिला वारकरी ही भक्तीची परंपरा पुढच्या पिढीकडे नकळत सोपवत असतात

Tulsi Manjiri | आयुर्वेदातच नाही तर पारंपरिक वापरात अतिशय महत्वाची तुळशीची मंजिरी!