पुढारी वृत्तसेवा
कलिंगड कमी कॅलरीचे असले तरी त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून अनेक पोषक घटक असतात
कलिंगडामध्ये सुमारे ९५ टक्के पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त असे फळ आहे
कलिंगडाचा रसाळ लाल भाग खाऊन त्याची साल फेकून दिली जाते, पण प्रत्यक्षात कलिंगडाची साल अजिबात निरुपयोगी नाही
कलिंगडाचा लाल गर सर्वाधिक खाल्ला जात असला तरी साल आणि बियाही शरीरासाठी पोषक घटकांनी समृद्ध आहेत
कलिंगडात नैसर्गिक साखर, फायबर व प्रथिने, तसेच व्हिटॅमिन C आणि A यासारखी आवश्यक जीवनसत्त्वे असतात
कलिंगडातील पोटॅशियम आणि लाइकोपीन हे घटकही मुबलक प्रमाणात आढळतात, जे एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत
सालीचा पांढऱ्या भागाचे तुकडे करून त्यात मीठ, हळद, बडीशेप आणि इतर मसाले, मोहरीचे तेल घालून गोड-आंबट लोणचे बनवता येते
सालीचा हिरवा भाग काढून टाका, पांढरा भाग चिरून उकळा आणि साखरेच्या पाकात शिजवा. वेलची किंवा केशर घालून जॅम बनवा
हिरवा भाग काढून पांढरा भाग चिरून मिक्सरमध्ये ब्लेंड करा. चव आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी त्यात चिया किंवा सब्जा बिया घालून स्मूदी तयार करता येते