उन्हाळ्यात पांढरेच कपडे का? जाणून घ्या यामागचे 'थंड' विज्ञान!

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळा आणि फॅशन

उन्हाळ्याचा कडाका वाढला की आपण कपाटातील गडद रंगाचे कपडे बाजूला सारून पांढऱ्या कपड्यांना पसंती देतो. पण यामागे केवळ फॅशन नाही, तर विज्ञान आहे!

सूर्याची किरणे आणि परावर्तन

विज्ञान सांगते की, पांढरा रंग हा सूर्यप्रकाशाचा सर्वात मोठा 'परावर्तक' (Reflector) आहे. तो स्वतःवर पडणारी बहुतांश उष्णता परतवून लावतो.

उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण: पांढरे कपडे गडद रंगाच्या तुलनेत अत्यंत कमी उष्णता शोषतात, ज्यामुळे भर उन्हातही तुमचे शरीर थंड राहण्यास मदत होते.

अल्वेडो इफेक्ट (Albedo Effect): पांढरा रंग सूर्याची उष्णता शरीरापर्यंत पोहोचू न देता तिला 'बाऊन्स बॅक' करतो, यालाच विज्ञानाच्या भाषेत 'हाय अल्वेडो' म्हणतात.

घाम आणि हवा खेळती राहणे: पांढरे सुती कपडे घाम लवकर शोषून घेतात आणि बाष्पीभवनास मदत करतात, ज्यामुळे आपल्याला घामामुळे होणारा चिकटपणा जाणवत नाही.

गडद रंगांचा धोका: याउलट, काळा किंवा इतर गडद रंग उष्णता शोषून घेतात (Absorb), ज्यामुळे शरीराचे तापमान वाढून अधिक उष्णता जाणवू लागते.

त्वचेचे संरक्षण: पांढरे आणि सैल सुती कपडे घातल्यामुळे सूर्याच्या अतिनील (UV) किरणांचा त्वचेवर थेट परिणाम कमी होतो आणि रॅशेसचा धोका टळतो.

आरोग्यदायी निवड: म्हणूनच, उन्हाळ्यात स्वतःला 'कूल' ठेवण्यासाठी पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या सुती कपड्यांची निवड करणे हीच सर्वात स्मार्ट निवड आहे!

येथे क्लिक करा...