उन्हाळ्यात सनस्क्रिन वापरताय, खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की तपासा

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात बाहेर पडताना सनस्क्रिन लावणे आवश्यक आहे, पण खरेदी करताना फक्त ब्रँड न पाहता SPF किती आहे हे जरूर तपासा.

तज्ज्ञांच्या मते किमान SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रिन रोजच्या वापरासाठी योग्य ठरते.

उत्पादनावर “Broad Spectrum” असा उल्लेख आहे का ते पाहा, कारण ते UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण देते.

तुमची त्वचा तेलकट, कोरडी की संवेदनशील आहे यानुसार स्किन टाइपनुसार फॉर्म्युला निवडणे महत्त्वाचे आहे.

जास्त घाम येत असल्यास किंवा पोहायला जाणार असाल तर Water Resistant सनस्क्रिन घ्या.

उत्पादनाची Expiry Date आणि उत्पादन तारीख (MFD) नक्की तपासा; कालबाह्य सनस्क्रिन परिणामकारक ठरत नाही.

घटक (Ingredients) यादीत Paraben, Artificial Fragrance यांसारखे घटक आहेत का ते पाहा, संवेदनशील त्वचेसाठी सौम्य फॉर्म्युला निवडा.

केवळ महाग आहे म्हणूनच चांगले असे नाही; त्वचेच्या गरजेनुसार योग्य सनस्क्रिन निवडणेच खरे सुरक्षिततेचे गमक आहे.

येथे क्लिक करा...