Morning Routine Psychology : सकाळी उठल्याबरोबर फोन बघता? हे फक्त व्यसन नाही, मानसशास्त्र काय सांगते?

पुढारी वृत्तसेवा

अंथरुणावरून उठण्याआधीच फोन स्क्रोल करण्याची सवय फक्त व्यसन नसून त्यामागे खास मानसशास्त्र आहे.

रात्रभरात जगात काय घडले किंवा कोणाचा मेसेज आलाय का, ही अनिश्चितता दूर करण्यासाठी मेंदू सकाळीच माहिती शोधतो.

अलार्म बंद करणे आणि फोन तपासणे ही एक 'क्यु-रूटीन-रिवॉर्ड' पद्धत बनून आपोआप घडणारी सवय होते.

रोज काहीतरी नवीन, एखादा मेसेज किंवा रील पाहायला मिळेल ही अपेक्षा मेंदूला दररोज सकाळी फोन पाहण्यास भाग पाडते.

कधी महत्त्वाचा ईमेल तर कधी काहीच नाही! पुढे काय दडलेय हे ठाऊक नसल्यामुळे ही सवय अधिक घट्ट आणि मजबूत होत जाते.

झोपेनंतर बाह्यजगापासून डिस्कनेक्ट झालेले मन वेळ, हवामान आणि कामाचे अपडेट्स घेऊन स्वतःला पुन्हा री-ओरिएंट करते.

आज काय कामे आहेत हे समजून घेण्यासाठी लोक सकाळी फोन पाहतात; याला मानसशास्त्रात 'दिशादर्शक वर्तन' (Orientation Behaviour) म्हणतात.

मात्र सकाळी जागे झालेवर मोबाईल फोन मिनिटाची पाहणी जर ४५ मिनिटांच्या स्क्रोलिंगमध्ये बदलत असेल, तर ही सवय नक्कीच मूडला हानी पोहोचवू शकते.

सकाळी फोन हाताळणे म्हणजे नेहमीच व्यसन नसते, तर ती मेंदूची अनिश्चितता संपवून नवीन दिवस सुरू करण्याची एक नैसर्गिक धडपड असते.

येथे क्‍लिक करा.