RELATIONSHIP TIPS : जोडीदारावर तुमचा विश्वास आहे का? याच्‍या थेट आरोग्‍यावर होतो परिणाम

पुढारी वृत्तसेवा

आपल्या मनात जोडीदाराबद्दल नक्की कोणत्या भावना आहेत आणि त्यावर आपला खरोखर किती पक्का विश्वास आहे? यावरच आपले आरोग्य अवलंबून असते.

AI-generated image

नुकत्‍याच 'बॉल स्टेट युनिव्हर्सिटी'च्या संशोधकांनी नात्यात असलेल्या ४८८ लोकांचा अभ्यास करून नात्यातील विश्वासाचा आरोग्यावर काय परिणाम होतो, हे शोधले.

AI-generated image

संशोधकांनी या लोकांच्या जोडीदाराबद्दलच्या भावना आणि विश्वासाची पातळी तपासून पुढील ४ महिने त्यांच्या मानसिक आरोग्याची पाहणी केली.

AI-generated image

आपण जोडीदारशी बाहेरून कसेही वागलो, तरी मनात जोडीदाराबद्दल खरी सकारात्मकता असेल, तरच नाते दीर्घकाळ आनंदी राहते.

ज्यांचा जोडीदारावर १००% विश्वास असतो, त्यांना नैराश्य आणि चिंतेचा त्रास कमी होतो तसेच रात्री झोपही छान लागते.

AI-generated image

मनात जोडीदाराबद्दल किंचितही शंका किंवा अविश्वास निर्माण झाला, ही नात्यात ताणतणाव आणि समस्येची पहिली पायरीच असते.

AI-generated image

नात्याला जितकी वर्षे जास्त होतात, तितका एकमेकांवरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि निर्णयांबद्दलची खात्री वाढते.

AI-generated image

जोडीदाराबरोबर रोजच्या आयुष्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे; पण मनात पक्का विश्वास असेल तर तात्पुरत्या रागाने नाते तुटत नाही.

AI-generated image

नवीन संशोधन हेच सांगते की, केवळ प्रेम व्यक्त करण्यापेक्षा जोडीदारावर मनापासून सकारात्मक विश्वास ठेवणे, हेच सुखी आणि निरोगी आयुष्याचे खरे रहस्य आहे!

येथे क्‍लिक करा.