पुढारी वृत्तसेवा
थंड हवेमुळे तहान कमी लागते आणि आपण पाणी कमी पितो कोमट पाणी सहज प्यायला जातं, त्यामुळे नैसर्गिकरीत्या हायड्रेशन वाढतं.
कोमट पाणी शरीरात पटकन शोषले जाते, त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल टिकून राहतो.
वरचेवर कोमट पाणी प्यायलं की रक्ताभिसरण सुधारतं आणि पेशींना योग्य प्रमाणात द्रव मिळतो.
डिहायड्रेशनमुळे होणारे डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यापासून कोमट पाणी आराम देतं.
कोमट पाणी पचनक्रिया सुधारतं अन्न व्यवस्थित पचल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहात नाही.
हिवाळ्यात किडनीवर ताण वाढू नये यासाठी कोमट पाणी महत्वाची भूमिका निभावते आणि टॉक्सिन्स बाहेर काढते.
थंड पाणी शरीराचं तापमान कमी करतं, तर कोमट पाणी शरीराला ऊब ठेवत पाण्याची गरज नैसर्गिकरीत्या वाढवतं.
कोमट पाण्यात लिंबू घातल्यास सिट्रिक अॅसिडमुळे मिनरल्सचे प्रमाण संतुलित राहते, जे हायड्रेशनसाठी आवश्यक आहे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते कोमट पाणी शरीरातील ओलावा टिकवून ठेवत स्किन हायड्रेट ठेवतं.