पुढारी डिजिटल टीम
भक्ती, यज्ञ, देवपूजा सगळं होतं होतं… पण पांडव मंदिरात जात नव्हते, जाणून घ्या यामागचं कारण.
पांडव देवी–देवतांचे भक्त होते. कृष्ण, शिव, सूर्य, धर्मराज, वायू यांच्यावर त्यांची आस्था होती. मात्र ते मूर्तिपूजा करत नसत आणि मंदिरातही जात नसत.
महाभारताचा काळ द्वापरयुगाचा शेवट आणि कलियुगाची सुरुवात मानला जातो. तो पूर्णपणे वैदिक परंपरांचा काळ होता, त्या काळात पूजा म्हणजे मंत्र, स्तोत्र आणि यज्ञ.
त्या काळी देवपूजा म्हणजे यज्ञ, हवन आणि वेद मंत्र म्हटले जात होते. निसर्गातील शक्तींना- अग्नि, वायु, सूर्य, चंद्र यांना अधिक महत्त्व होतं. मूर्तिपूजेला जास्त महत्त्व नव्हतं.
युधिष्ठिर: धर्मदेवतेचा उपासक, अर्जुन: श्रीकृष्णाचा भक्त, भीम: हनुमानाचा भक्त, द्रौपदी: दुर्गा उपासक, कर्ण: सूर्यदेव भक्त. त्या काळात यज्ञ आणि तपश्चर्येला महत्त्व होतं.
वैदिक काळात ईश्वर निराकार, अनंत मानला जात होता. मूर्ती म्हणजे देवाला एका रूपात बांधणे असे मानले जात होते. वेदांमध्ये मूर्तिपूजेचा उल्लेख जवळजवळ नाहीच.
महाभारतात कुठेही मंदिरांचा उल्लेख नाही. पूजा प्रामुख्याने नदीकाठी, जंगलात, यज्ञकुंडाजवळ, निसर्गरम्य वातावरणात केली जात असे.
500 BCE ते 200 CE—या काळात मूर्तिपूजा सुरू झाली. बौद्ध आणि जैन धर्मात मूर्ती पूजेची परंपरा होती. गुप्त काळ हा भारतात मंदिर निर्मितीचा सुवर्णकाळ मानला जातो.
पांडवांच्या काळात पूजेचा अर्थ वेगळाच होता. आजची मूर्तिपूजा आणि मंदिर संस्कृती हजारो वर्षांनंतर विकसित झाली. वेळेनुसार उपासनेची रूपं बदलली. (संदर्भ पुस्तक- भारतातील मूर्तीपूजा, पंडित राजेंद्र जी)