Rahul Shelke
भारताचा रुपया डॉलरसमोर 90 च्यावर घसरला आहे. याचा तुमच्या रोजच्या खर्चावर थेट परिणाम होणार आहे.
भारत 90% तेल आयात करतो, त्यामुळे रुपया घसरला की पेट्रोल-डिझेल लगेच महाग होतं. घरगुती गॅस आणि खाद्य तेलापर्यंतच्या सर्व वस्तूंचे भाव वाढतात.
डॉलर महाग झाल्याने परदेशात जाण्याचा खर्च 15–20% वाढला आहे. हॉटेल, शॉपिंग, तिकीट सगळंच महाग होतं.
विद्यार्थ्यांच्या फी आणि खर्चात 5–10 लाखांनी वाढ होते. रुपया पडल्याने प्रत्येक डॉलरवर 12–13% जास्त भार लागतो.
मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि गॅजेटसाठी वापरले जाणारे पार्ट आयात होतात. रुपया घसरल्याने हे सर्व प्रॉडक्ट्स आता आणखी महाग होणार.
इम्पोर्टेड पार्ट्स आणि कच्चा माल महाग होणार. उत्पादनाचा खर्च वाढल्याने नफा कमी आणि वस्तूंची किंमत वाढणार.
अमेरिकेसोबत ट्रेड टेन्शन वाढलं आहे. 2025 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधून $17 अब्ज काढले. रिझर्व्ह बँकेने डॉलरची विक्री कमी केल्याने दडपण वाढलं आहे.
Bloomberg च्या मते 2025 मध्ये रुपया “Asia's worst performing currency” आहे.
विशेषज्ञ म्हणतात रुपया पुढे ₹91 पर्यंतही घसरु शकतो.
काही निर्यातदारांना थोडा फायदा होऊ शकतो. पण एकूण परिणाम काय तर सामान्य नागरिकांसाठी महागाई वाढणार आहे.