पुढारी वृत्तसेवा
मेटाबॉलिझम स्लो होतो
अचानक खाणं कमी केल्यावर शरीर ‘स्टार्व्हेशन मोड’मध्ये जातं आणि मेटाबॉलिझम मंदावतो.
शरीर फॅट साठवू लागतं
कमी अन्न मिळालं की शरीर ऊर्जेची बचत करण्यासाठी चरबी साठवू लागतं.
स्नायूंचं नुकसान होतं
अचानक डाएट केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि फॅट जास्त टिकून राहतं.
हार्मोनल असंतुलन निर्माण होतं
लेप्टिन, इन्सुलिन, कोर्टिसोल यांसारखी हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे वजन वाढतं.
भूक अधिक वाढते
कमी खाल्ल्यामुळे नंतर अचानक जास्त भूक लागते आणि ओव्हरईटिंग होतं.
शरीर पाणी साठवू लागतं
स्ट्रेसमुळे शरीरात वॉटर रिटेन्शन वाढतं आणि वजन वाढल्यासारखं दिसतं.
थकवा आणि अशक्तपणा वाढतो
ऊर्जा कमी मिळाल्यामुळे शरीर सुस्त होतं आणि हालचाल कमी होते.
पचनसंस्था बिघडते
अनियमित खाण्यामुळे पचन बिघडतं आणि वजन नियंत्रणात राहत नाही.
संतुलित आहारच योग्य मार्ग
हळूहळू, संतुलित पद्धतीने खाणं कमी केल्यासच वजन योग्य पद्धतीने घटतं.