पुढारी वृत्तसेवा
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण आखाती प्रदेश युद्धाच्या छायेत आहे.
अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात देशाचे सर्वोच्च नेते खामेनी ठार झाल्यानंतर इराणने आपल्या लष्करी डावपेचात मोठा बदल केला आहे.
इराणने आपल्या शक्तिशाली 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ची पुनर्रचना करत 'मोझॅक डिफेन्स' विकेंद्रीकरण संरक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे.
'मोझॅक डिफेन्स' अंतर्गत ३१ स्वायत्त युनिट्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात राजधानी तेहरानसाठी १ आणि उर्वरित ३० प्रांतांसाठी प्रत्येकी एक युनिट तैनात असेल.
मोठ्या युद्धाच्या प्रसंगी मध्यवर्ती कमांडवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर गनिमी काव्याने लढा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक विश्लेषकांच्या मते, ‘मोझॅक’मुळे ३१ स्वायत्त युनिट्सला क्षेपणास्त्र डागणे, ड्रोन हल्ले किंवा गनिमी काव्याने हल्ल्यासाठी केंद्राच्या 'ग्रीन सिग्नल'ची गरज भासणार नाही.
इराणने आपल्या दुर्गम पर्वतरांगा आणि वाळवंटी प्रदेशाचा वापर 'किल झोन' म्हणून करण्याचे नियोजन केले आहे.
युद्धादरम्यान केंद्राशी असलेला संपर्क तुटला तरी या ३१ तुकड्या आधीच दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार युद्ध सुरू ठेवतील.
'मोझॅक' डिफेन्स टेक्निकच्या माध्यातून सैन्याचेच विकेंद्रीकरण करण्याच्या युद्धपद्धतीमुळे अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करासमोर मोठे आव्हान असणार आहे.