Dehydration Causes | दिवसातून भरपूर पाणी पिऊनही शरीर 'डिहायड्रेट' का राहते? जाणून घ्या कारणे

पुढारी वृत्तसेवा

इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता: शरीरात केवळ पाणी नाही, तर सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या क्षारांचीही गरज असते. या क्षारांशिवाय पेशी पाणी शोषून घेऊ शकत नाहीत.

how much water to drink in winter

अति प्रमाणात पाणी पिणे: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील महत्त्वाचे क्षार लघवीवाटे बाहेर निघून जातात, ज्याला 'वॉटर फ्लशिंग' म्हणतात. यामुळे शरीर अधिक डिहायड्रेट होते.

drinking water | pudhari photo

चहा आणि कॉफीचे अतिसेवन: कॅफिनयुक्त पेये लघवीचे प्रमाण वाढवतात (Diuretic), ज्यामुळे तुम्ही जितके पाणी पिता त्यापेक्षा जास्त शरीरातून बाहेर पडते.

Tea | Pudhari

मधुमेहाचे संकेत: जर तुम्हाला सतत तहान लागत असेल आणि भरपूर पाणी पिऊनही घसा कोरडा राहत असेल, तर हे रक्तातील साखर वाढल्याचे किंवा मधुमेहाचे लक्षण असू शकते.

Pre Diabetic | pudhari photo

मिठाचे अतिसेवन: आहारात मिठाचे (सोडियम) प्रमाण खूप जास्त असेल, तर शरीर पेशींमधील पाणी ओढून घेते, ज्यामुळे तुम्हाला सतत तहान लागते.

Moist salt Prevent tips

औषधांचा परिणाम: काही ठराविक औषधे (उदा. रक्तदाबाची औषधे) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करतात, ज्यामुळे पाणी पिऊनही हायड्रेशन जाणवत नाही.

औषधांना कडू चव का असते? ही चव महत्त्वाची का आहे? | File Photo

उभ्याने पाणी पिणे: आयुर्वेदानुसार उभ्याने पाणी प्यायल्याने ते वेगाने शरीराबाहेर जाते आणि शरीरातील अवयवांना पाणी शोषण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

फायबरचा अभाव: आहारात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर पाणी पचण्यास आणि शरीरात टिकून राहण्यास मदत होते. फळे आणि भाज्यांचा अभाव डिहायड्रेशन वाढवू शकतो.

Fruit | pudhari photo

उन्हात काम: कडक उन्हात काम करताना केवळ पाणी पिऊन भागत नाही, कारण घामावाटे क्षार निघून जातात. अशा वेळी ओआरएस (ORS) किंवा लिंबू पाणी घेणे आवश्यक असते.

Sleep Drooling | Pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>