Snake Shedding | साप आपली कात का टाकतो? काय आहे शास्त्रिय कारण

Namdev Gharal

सापांचे शरिर आयुष्यभर वाढतच असते त्‍यामुळे तो आपल्या आयुष्यातील महत्‍वाची क्रिया करत असतो ते म्हणजे कात टाकणे या प्रक्रियेला 'एक्डायसिस' (Ecdysis) किंवा shedding म्हणतात.

पण याच्या पाठीमागे शास्त्रिय कारण असते. सापाची वाढ कायम होत असते पण त्‍याची त्‍वचा माणसासारखी लवचिक नसते

जेव्हा सापाचे शरीर मोठे होते, तेव्हा जुनी त्वचा त्याला अपुरी पडू लागते त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी साप जुनी त्वचा सोडून देतो.

कात टाकण्यापूर्वी त्‍याच्या शरिरावर एक चमकदार आणि नवी त्‍वचा तयार झालेली असते.

दुसरी गोष्ट म्हणजे साप सरपटणारा प्राणी आहे. जमीण झाडे झुडपे यांच्यावरुन सरपटताना अनेक परजीवी त्‍याच्या त्‍वचेवर चिकटतात

गोचीड, किडे हे परजीवी सापाच्या आरोग्याला घातक असतात. कात टाकल्यामुळे या सर्व हानिकारक परजीवींपासून सापाची सुटका होते.

सापाला पापण्या नसतात. त्याच्या डोळ्यांवर एक पारदर्शी पडदा असतो, ज्याला 'स्पेक्टॅकल' (Spectacle) म्हणतात. कात टाकताना हा जुना पडदाही निघून जातो

कात टाकण्यापूर्वी सापाचे डोळे दुधी किंवा निळसर रंगाचे होतात. बऱ्याच वेळा कात टाकण्याच्या वेळी सापाची दृष्टीही अधू झालेली असते

त्वचा सैल झाल्यावर तोंडाजवळील भाग मोकळा झाला की, साप झाडांच्या फांद्या किंवा दगडधोंड्यातून पुढे जातो यामुळे जुनी कात निघून जाते.

तरुण सापांची वाढ झपाट्याने होत असते ते वर्षातून अनेकदा कात टाकतात. पूर्ण वाढ झालेले प्रौढ साप वर्षातून साधारणपणे २ ते ४ वेळा कात टाकतात.

हा सरडा जमिनीप्रमाणे पाण्यावर ही सहज धावतो तसेच पोहतोही वेगात!