Basilisk Lizard | हा सरडा जमिनीप्रमाणे पाण्यावर ही सहज धावतो तसेच पोहतोही वेगात!

Namdev Gharal

Basilisk Lizard बॅसिलिस्क सरडा हा जगातील वैशिष्ट्यपूर्ण आहे तो जसा जमिनीवर धावतो तसा पाण्यावरही सहज धावतो यामुळे त्‍याला 'जीझस क्राइस्ट लिझार्ड' या नावानेही ओळखले जाते.

मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये या सरड्यांचा अधिवास आहे. ते बहुतेक वेळा नद्या किंवा तलावांच्या काठावर असलेल्या झाडांवर राहतात.

बॅसिलिस्क सरड्याचे पाण्यावर चालणे ही निसर्ग व विज्ञानाची एक अद् भूत किमया आहे. त्‍याच्या पायांमध्ये असलेल्या मॅकनिझम मुळे तो सहजच पाण्यावर चालतो

या सरड्याच्या मागच्या पायांची बोटे लांबचक असतात. या बोटांच्या कडेला त्वचेचे लहान पडदे किंवा झालर (Fringes) असतात.

जेव्हा हा सरडा जमिनीवर सामान्यपणे चालतो तेव्हा हे पडदे मिटलेले असतात, पण पाण्यावर धावताना ते पूर्णपणे उघडतात. याचा फायदा त्‍यांना होतो.

जेव्हा सरडा आपला पाय पाण्यावर जोरात मारतो, तेव्हा त्याच्या रुंद पाय व पाण्याचा सरफेस यामध्ये एक 'हवेचा खिसा' Air Pocket तयार होते

हे Air Pocket हा खिसा सरड्याचे वजन पेलतो आणि जोपर्यंत तो पाय वेगाने मागे घेतो, तोपर्यंत त्याला पाण्यात बुडू देत नाही

हा सरडा अतिशय वेगाने पाय हलवतो. तो इतक्या वेगाने हालचाल करतो की गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचण्याआधीच तो पुढचे पाऊल टाकतो

यांचा रंग सहसा हिरवा किंवा तपकिरी असतो, ज्यामुळे ते झाडाझुडपांत सहज लपून राहू शकतात. नर बॅसिलिस्कच्या डोक्यावर आणि पाठीवर विशिष्ट प्रकारचे तुरे (Crests) असतात.

हे मिश्राहारी जीव असतात. ते कीटक, लहान फुले, फळे आणि कधीकधी लहान उंदीर किंवा इतर सरडे खातात.

बॅसिलिस्क सरडा पाण्यावर साधारणपणे ५ ते २० मीटर (१५ ते ६६ फूट) अंतर धावू शकतो. एकदा का त्याचा वेग कमी झाला की तो पाण्यात सरळ पोहू लागतो.

जेव्हा बॅसिलिस्क सरड्याला एखाद्या शिकाऱ्यापासून धोका वाटतो, तेव्हाच तो बचावासाठी जमिनीवरून थेट पाण्याकडे धाव घेतो आणि पाण्यावरून पळत सुरक्षित ठिकाणी जातो.