Brumation | हिवाळ्यात साप का दिसत नाहीत? ‘ब्रुमेशन‘ अवस्थेत का जातात?

Namdev Gharal

हिवाळयात साप कमी प्रमाणात न दिसण्यामागे प्रमुख कारण आहे त्‍यांचे रक्त, सर्व साप हे थंड रक्ताचे प्राणी असतात

यामुळे ते स्वताच्या शरिराचे तापमान स्वतः नियंत्रित करु शकत नाहीत त्‍यामुळे बाहेरील वातावरणावरच त्‍यांच्या शरीराचे तापमान अवलंबून असते

जसे स्तस्तन प्राणी हिवाळयात हायबरनेशनमध्ये जातात तसे सरपटणारे प्राणी ब्रुमेशनमध्ये जातात यावेही बिळात राहून किंवा उष्णतेच्या ठिकाणी थांबून आपल्या शरीराचे तापमान योग्य ठेवण्याचा प्रयत्‍न करतात

थंडीमुळे सापांच्या शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) अत्यंत मंदावते. यामुळे त्यांना ऊर्जेची कमी गरज भासते आणि ते हालचाल करणे कमी करतात.

स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी साप जमिनीखालील बिळे, जुन्या इमारतींच्या भेगा, लाकडांचे ढीग किंवा दगडांच्या कपारीत लपून बसतात.

शरीरातील ऊर्जा वाचवण्यासाठी साप या काळात शिकार करणे थांबवतात. हिवाळ्यापूर्वी त्यांनी जे अन्न खाल्लेले असते, त्यावरच ते पूर्ण हंगाम काढू शकतात.

कधीकधी खूप कडाक्याच्या थंडीत दुपारी कडक ऊन पडल्यास, शरीर उबदार करण्यासाठी साप थोड्या वेळासाठी बाहेर दिसू शकतात, याला 'Basking' म्हणतात.

पण ज्यावेळी बाहेर पडतात त्‍यावेळी ते फक्त उन्हांत शरीर गरम करतात, उर्जावाचवण्यासाठी ते शिकार करत नाहीत

Black Mamba