Black Mamba |जगातील सर्वात वेगवान विषारी साप, हत्तीचेही प्राण घ्येण्याची क्षमता!

Namdev Gharal

प्रामुख्याने आफ्रिका खंडात आढणारा हा साप अतिजहाल विषारी असतो त्‍याच्या तोंडातील काळ्या रंगावरुन त्‍याला ब्लॅक मांबा असे नाव पडले आहे

त्याचा शरीराचा रंग काळा नसून राखाडी किंवा ऑलिव्ह रंगाचा असतो. त्याच्या तोंडाचा आतील भाग गडद काळा असतो

ब्लॅक मांबा जमिनीवर १६ ते १९ किमी प्रति तास वेगाने धावू शकतो. त्‍यामुळे याच्या हातून सावज निसटने अशक्य असते

साधारणपणे १०० ते २०० मीटर पर्यंत तो वेगाने जाऊ शकतो. तो प्रामुख्याने सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी किंवा अचानक हल्ला करण्यासाठी या वेगाचा वापर करतो.

पूर्ण वाढ झालेल्या ब्लॅक मांबाची लांबी ही १० फूट ते १४ फूटापर्यंत असते. हा साप जाड नसतो पण मानेच्या स्नायू ताणवून भिती दाखवतो

ब्लॅक मांबा हा लांब अंतरापर्यंत धावत नाही. तो आपला जास्तीत जास्त वेग केवळ थोड्या अंतरासाठीच टिकवून ठेवू शकतो. सुरक्षित अंतरावर पोहचण्यासाठी किंवा सावजाचा पाठलाग करताना

याचे विष अतिशय जहाल 'न्यूरोटॉक्सिक' (Neurotoxic) असते, जे थेट मज्जासंस्थेवर (Nervous System) हल्ला करते. याच्या एका दंशामुळे मानवाचा श्वास गुदमरतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

योग्य उपचार न मिळाल्यास ब्लॅक मांबाने चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता १००% असते. याला 'Kiss of Death' असेही म्हटले जाते.

या सापाचे केवळ दोन थेंब विष एका प्रौढ माणसाचा जीव घेण्यास पुरेसे असते. तर मोठ्या हत्तीला याने अनेकवेळा दंश केला तर हत्तीचा जीव जावू शकतो

आफ्रिकेतील जंगलांमध्ये अशा अनेक घटनांची नोंद आहे जिथे ब्लॅक मांबाच्या एका दंशामुळे पूर्ण वाढ झालेल्या आफ्रिकन हत्तींचा मृत्‍यू झाला आहे.

हा साप स्वभावाने लाजाळू असतो, पण जर त्याला धोका जाणवला किंवा त्याला कोपऱ्यात पकडले गेले, तर तो अत्यंत आक्रमक होतो