‘कांटा लगा’मधून रातोरात स्टार झालेली शेफाली इंडस्ट्रीतून अचानक गायब का झाली?
पुढारी वृत्तसेवा
१५ डिसेंबर १९८२ जन्मलेली शेफाली जरीवालाचे अवघ्या ४२ व्या वर्षी तिचं निधन झालं.
instagram
२००२ मध्ये रिलीज झालेलं ‘काटा लगा’ या गाण्यान तिचं नशीब बदललं. त्या वेळी शेफाली २० वर्षांची होती, एका रात्रीत ती स्टार बनली होती.
बोल्ड कपडे, नखरेल स्टाईल आणि डोळ्यातली अदा, यामुळे शेफालीचा ‘काटा लगा’ लूक तरुणाईच्या मनावर छाप पाडून गेला.
शेफालीने computer science मध्ये शिक्षण घेतलं होतं. तिने IIT मुंबईमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
२००२ हे वर्ष पूर्णपणे शेफालीच्या नावावर होतं. ‘कांटा लगा’ गाणं सुपरहिट झाल्यानंतर प्रत्येक निर्माता तिच्यासोबत काम करू इच्छित होता.
मात्र, काही मोजक्या म्युझिक व्हिडीओ आणि एका-दोन सिनेमांतील कॅमिओ नंतर ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली.
एका मुलाखतीत शेफालीने सांगितलं होतं की तिला वयाच्या १५ व्या वर्षापासून मिरगीचे झटके यायचे. यामुळेच तिने फारसे प्रोजेक्ट्स घेतले नाहीत आणि मनोरंजनसृष्टीपासून अंतर ठेवले.
२००४ साली शेफालीने Meet Bros फेम हरमीत सिंह याच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी २००९ साली घटस्फोट घेतला.
एका मुलाखतीत शेफालीने नाव न घेता तिच्या पहिल्या लग्नातील विभक्त होण्यामागे मानसिक छळ हे कारण सांगितलं होतं.
काही वर्षांनी ‘पवित्र रिश्ता’ फेम पराग त्यागी शेफालीच्या आयुष्यात आला. त्यांनी काही वर्षं एकमेकांना डेट केलं आणि २०१५ मध्ये कोर्ट मॅरेज केलं.
शेफाली आई व्हायचं स्वप्न पाहत होती. ती आणि पराग मूल दत्तक घेणार होते. मात्र ही प्रक्रिया त्यांच्या साठी खूप गुंतागुंतीची होती. दोघांनी यावर उघडपणे संवाद साधला होता.