दंगल गर्ल फातिमा सना शेख तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहते. .फातिमाचा नवीन चित्रपट 'आप जैसा कोई' ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता आर माधवनसोबत पहिल्यांदाच काम करत आहे..याचदरम्यान फातिमाच्या अफेअरची चर्चाही रंगली आहे. तिचे नाव अभिनेता विजय वर्मासोबत जोडले जात आहे..यावर फातिमाने मौन सोडले आहे. सध्या फातिमा ही तिच्या आगामी 'आप जैसा कोई' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. .या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत झाला. यावेळी माध्यमांनी फातिमाला तिच्या नात्याबाबत प्रश्न विचारला. .त्यावेळी तिने अफेअर्सच्या अफवांचे खंडण करत सिंगल असल्याचे म्हटले आहे. .फातिमा म्हणाली, होय मी सध्या सिंगल आहे. एक परिपूर्ण नाते ते असते, जिथे दोन लोक एकमेकांचा आदर करतात, समजून घेतात आणि सोबत पुढे जातात. .आजकाल चांगली मुले कुठेच सापडत नाहीत. ते चित्रपटांमध्ये पाहायला मिळते, खऱ्या आयुष्यात नाही, असेही फातिमा म्हणाली. .विजय आणि फातिमा हे 'गुस्ताख इश्क' या चित्रपटात दिसणार आहेत..सावर रे मना... नको बघू इतकं प्रेमाने तिला; प्राजक्ता माळीचे खास फोटो