cat facts | संशोधक मांजराला 'बायोलॉजिकली परफेक्ट' का म्‍हणतात?

पुढारी वृत्तसेवा

प्राणी शास्त्रज्ञांच्या मते, मांजर ही निसर्गाची सर्वात उत्कृष्ट कलाकृती आहे. या इवल्याशा जिवाच्या परिपूर्णतेमागचं रहस्य तुम्हाला ठाऊक आहे का? चला जाणून घेऊया!

आजकाल धावपळीच्या जगात माणसं सगळं काही परफेक्ट करण्याच्या मागे धावतोय पण, दुसरीकडे मांजर हा असा प्राणी आहे जो कोणत्याही घाईशिवाय आणि कुणालाही न घाबरता लाखो वर्षांपासून अगदी आरामात आणि 'परफेक्ट' जगतोय.

संशोधकांचं म्हणणं आहे की, मांजर हा पृथ्वीवरील सर्वात 'बायोलॉजिकली परफेक्ट' प्राणी आहे. त्यांचं शरीर आणि त्यांची रचना इतकी खास आहे की, ती पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

निसर्ग एखाद्या प्राण्यात बदल करणं तेव्हाच थांबवतो जेव्हा तो प्राणी आधीच परिपूर्ण असतो. मांजरींची शरीररचना आणि स्वभाव लाखो वर्षांपासून तसाच आहे. कारण त्यात सुधारणेला जागाच उरली नाहीये!

Smallest Pet Cat | file photo

मांजराला अंधारात माणसापेक्षा ६ पट जास्त चांगलं दिसते, आवाजाशिवाय चालणं आणि विजेच्या वेगाने हालचाल करणं... मांजरींच्या या क्षमता कोणत्याही सुपरहिरोपेक्षा कमी नाहीत!

मांजरींकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे ऊर्जेचा विनाकारण वापर टाळा. त्या दिवसभर आराम करतात, पण जेव्हा गरज असते तेव्हा पूर्ण एकाग्रतेने आणि वेगाने काम फत्ते करतात.

मांजरींची मज्जासंस्था खूप भारी असते. त्या नेहमी सावध असतात, पण कधीही तणावात नसतात. शिकार करताना त्या जेवढ्या आक्रमक असतात, एरवी तेवढ्याच शांत असतात.

मांजरी स्वतःला चाटून स्वच्छ ठेवतात, हे केवळ सौंदर्यासाठी नाही. ही त्यांची स्वतःची 'ब्युटी आणि हेल्थ सिस्टीम' आहे, ज्यामुळे शरीराचं तापमान नीट राहतं आणि त्यांचा ताणही कमी होतो.

मांजरींना कुणाच्याही कौतुकाची किंवा मंजुरीची भूक नसते. त्या कोणाला सिद्ध करण्यासाठी जगत नाहीत, त्या स्वतःच्या अटींवर जगतात आणि म्हणूनच त्या एवढ्या खुश असतात.

येथे क्‍लिक करा.