पुढारी वृत्तसेवा
पपईमध्ये 'पपेन' नावाचे एंझाइम असते, ते अन्नाचे जलद विघटन करून पचनशक्ती सुधारण्यास मदत करते.
अननसामध्ये 'ब्रोमेलेन' मुबलक प्रमाणात असते. हे प्रथिनांच्या पचनास मदत करते आणि पोटफुगीची समस्या कमी करते.
फायबर आणि पेक्टिनने समृद्ध असलेले सफरचंद आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवून पचन सुलभ करते.
केळी पचायला हलकी असतात. ती ॲसिडिटी कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास अत्यंत फायदेशीर आहेत.
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेला पेरू बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतो आणि पचन संस्था सक्रिय ठेवतो.
संत्र्यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पचन प्रक्रिया हलकी आणि सुरळीत राहते.
किवीमध्ये 'ॲक्टिनिडिन' नावाचे एंझाइम असते, जे विशेषतः प्रथिनांचे पचन वेगाने करण्यास मदत करते.
पाण्याने भरपूर असलेले कलिंगड शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या रोखून पचनास मदत करते.
डाळिंब आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असून पचनाशी संबंधित दाह किंवा जळजळ कमी करण्यास मदत करते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.