वैमानिकांना उड्डाणावेळी परफ्युम, आफ्टर शेव्ह वापरण्यास का असते बंदी?

Anirudha Sankpal

प्रवाशांची सुरक्षितता आणि विशिष्ट नियमांमुळे पायलट परफ्युम वापरत नाहीत.

अनेक परफ्युम आणि आफ्टरशेव्हसारख्या उत्पादनांमध्ये अल्कोहोल (इथाइल अल्कोहोल) असते.

उड्डाणापूर्वी पायलटला ब्रेथलायझर चाचणी (अल्कोहोल चाचणी) देणे अनिवार्य असते.

परफ्युममधील अल्कोहोलच्या वाफेमुळे ब्रेथलायझर चाचणीमध्ये 'फॉल्स पॉझिटिव्ह' निकाल येण्याची शक्यता असते.

अशा चुकीच्या निकालामुळे पायलटवर कारवाई होऊन उड्डाणाला विलंब होऊ शकतो.

तीव्र सुगंधामुळे कॉकपिटमध्ये पायलटचे (किंवा सह-पायलटचे) लक्ष विचलित होऊ शकते.

विमानातील वातावरण बंदिस्त (Sealed) असते, ज्यामुळे सुगंध लगेच पसरतो.

अनेक प्रवासी आणि क्रू मेंबर्सना तीव्र सुगंधाची ॲलर्जी किंवा अस्थमासारख्या श्वासोच्छ्वासच्या समस्या असतात.

ब्रेथलायझर चाचणीचे नियम पाळण्यासाठी आणि विमानातील सहकाऱ्यांच्या व प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पायलट परफ्युम वापरणे टाळतात.

लिंक कमेंटमध्ये