अविनाश सुतार
ही परंपरा स्पेन मध्ये सुरू झाली. याला 'Las doce uvas de la suerte' म्हणतात. रात्री १२ वाजता घड्याळाचे जे १२ ठोके पडतात, त्या प्रत्येक ठोक्याला एक याप्रमाणे १२ द्राक्षे खाल्ली जातात
ही १२ द्राक्षे वर्षाच्या १२ महिन्यांचे प्रतीक मानली जातात आणि यामुळे नवीन वर्ष भाग्यशाली, आनंददायी, आणि सुख समृद्धीचे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे
१२ द्राक्षे खाण्याची परंपरा स्पेनमध्ये १८०० व्या शतकाच्या अखेरीस किंवा १९०० व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली. त्यामागे दोन लोकप्रिय कथा आहेत.
पहिली कथा अशी की,स्पॅनिश शेतकऱ्यांकडे एका वर्षी द्राक्षांचे मोठे उत्पादन झाले होते. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री द्राक्षे खाण्याची संकल्पना सुरू केली
दुसरी कथा अशी की, समृद्ध स्पॅनिश नागरिक नवीन वर्षाचे स्वागत द्राक्षे आणि शॅम्पेनसह करत होते. हीच परंपरा पुढे चालू राहिली
ही परंपरा आता मेक्सिको, अर्जेंटिना, पेरू, चिली आणि यूएस सारख्या देशांमध्ये पसरली आहे, विशेषतः स्पॅनिश बोलणाऱ्या समुदायांमध्ये जास्त लोकप्रिय आहे
स्पेनमध्ये कुटुंबे आणि मित्र एकत्र येतात, द्राक्षे हातात घेतात आणि नववर्षाच्या काउंटडाउनसाठी तयार राहतात
गोड द्राक्ष म्हणजे आनंदी महिना, आंबट द्राक्ष म्हणजे आव्हाने किंवा शिकवणी, मोठी द्राक्षे म्हणजे समृद्धी असे मानले जाते
छोटी द्राक्षे म्हणजे साधेपणा, हे लक्षात घेता जीवनामध्ये चांगले आणि कठीण दोन्ही क्षण असतात, यावर विचार आणि आशा ठेवणे महत्वाचे असते