Rare Pink Animals | 'हे' गुलाबी रंगाचे प्राणी, पक्षी चटकन लक्ष वेधून घेतात

पुढारी वृत्तसेवा

गुलाबी रंगाचे प्राणी सहसा दिसत नाही, पण जगाच्या विविध भागांत काही प्राणी नैसर्गिकरित्या या रंगाचे असतात

बहुतांश प्राणी हिरवे, तपकिरी किंवा करड्या रंगछटांमध्ये आढळून येतात; परंतु काही प्राणी गुलाबी रंगामुळे विशेष उठून दिसतात

ऑर्किड मॅन्टिस (Orchid Mantis)

आशियातील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळणारा ऑर्किड मॅन्टिस हा अत्यंत आकर्षक कीटक आहे. तो गुलाबी व तपकिरी रंगामध्ये बदल करू शकतो

गुलाबी कॅटिडिड (Pink Katydid)

काही कॅटिडिड कीटक गुलाबी रंगाचेही आढळतात. हे ‘एरिथ्रिझम’ नावाच्या जनुकीय बदलामुळे होते, ज्यामुळे लाल रंगद्रव्य अधिक प्रमाणात तयार होतो

जाळीदार पायांचा गेको (Web-Footed Gecko)

दक्षिण आफ्रिकेतील नामीब वाळवंटात जाळीदार पायांचा गेको नावाचा एक लहान सरपटणारा प्राणी आढळतो. त्याची त्वचा जवळजवळ पारदर्शक असून हलक्या गुलाबी रंगाची असते

पाळीव डुक्कर (Domestic Pig)

गुलाबी रंगाचा सर्वाधिक ओळखीचा प्राणी म्हणजे पाळीव डुक्कर. शेतांमध्ये आढळणाऱ्या डुकरांचा गुलाबी रंग निवडक प्रजननामुळे निर्माण झाला आहे

मेजर मिशेल्स कॉकाटू (Major Mitchell’s Cockatoo)

ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत भागात आढळणाऱ्या मेजर मिशेल्स कॉकाटूला मऊ गुलाबी पिसे तसेच लाल व पिवळ्या रंगांची शिखा असते. तो कोरड्या वनप्रदेशात राहतो

गलाह (Galah)

गलाह किंवा गुलाबी व करड्या रंगाचा कॉकाटू हा ऑस्ट्रेलियातील सर्वात सामान्य आणि जुळवून घेणारा पक्षी आहे. त्याचे गुलाबी शरीर आणि करडे पंख यामुळे तो सहज ओळखता येतो

गुलाबी ड्रॅगन मिलिपीड (Pink Dragon Millipede)

गुलाबी ड्रॅगन मिलिपीडचे शरीर तेजस्वी गुलाबी रंगाचे व काटेरी दिसणारे असते, तो हायड्रोजन सायनाइड हे विषारी रसायन तयार करतो, जे भक्षकांसाठी घातक आहे

येेथे क्लिक करा