Peacock |तुम्हाला माहिती आहे का मोराच्या पिसाऱ्यात किती पिसे असतात? दरवर्षी पिसारा का गळतो?

Namdev Gharal

मोराला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते,तसेच तो भारताचा राष्ट्रीय पक्षीही आहे.आपल्या संस्कृतीत मोराला अनन्यसाधारण महत्‍व आहे. देखणा व रुबाबदार असे याचे रुप असते.

मोराचा पिसारा हा त्‍याच्या मधील मुख्य आकर्षण आहे. मोरपंखी हा आपल्याकडील एक रंगही आहे. दरवर्षी पावसाळयाच्या सूरवातीला मोराचे पिसारा फूलवून होणारे नृत्‍य म्हणजे निसर्गातील एक चित्रपटच

पण मोर हा पिसारा लांडोरला भूरळ पाडण्यासाठी फुलवत असतो, पावसाळयाच्या सुरवातीला मोरांचा प्रजननाचा काळ असतो याच काळात मोराची पिसे ही पूर्ण वाढ झालेली व चमकदार असतात

या पिसांचे वाढ व गळणे ही मोरांच्या आयुष्यातील महत्‍वाचा घटक असतो. पावसाळ्याच्या सुरवातीला त्‍यांच्या पिसांची पूर्णवाढ झालेली असते. यावेळी तो हे नृत्‍य करत असतो

पण विणीचा हंगाम संपला की ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तो आपली पिसे गाळण्यास सुरवात करतो. कारण हा पिसारा सांभाळण्यासाठी मोराला खूप उर्जेची गरज लागते

एका मोराच्या शेपटीमध्ये साधारणता १५० ते २०० पिसे असतात. जुन्या पिसांची चमक कालांतराने कमी होते आणि ती घासली गेल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे कमकुवत होतात.

पिसारा गळल्यानंतर लगेचच शरीरात नवीन पिसे येण्याची प्रक्रिया सुरू होते. ही पिसे पूर्णपणे वाढण्यासाठी साधारण ५ ते ६ महिने लागतात.

पुढच्या वर्षीचा पावसाळा येईपर्यंत (मे-जून महिन्यापर्यंत) मोराचा पिसारा पुन्हा पूर्णपणे वाढून तयार होतो. याच वेळी पावसाचे आगमन आणि मोराचा प्रजननाचा काळ एकाच वेळी येतो

तरुण मोरांचा पिसारा फिका असतो. मोर जसजसा मोठा होतो (साधारण ३ वर्षांनंतर), तसतसा त्याच्या पिसाऱ्याचा रंग अधिक गडद, चमकदार आणि आकर्षक होत जातो.

पूर्ण वाढ झालेल्या मोराच्या पिसाऱ्याची लांबी साधारणपणे ९० सेंमी ते १५० सेंमी (३ ते ५ फूट) असते पिसारा धरून नर मोराची लांबी २०० सेंमी पेक्षा जास्त असू शकते.

यातील बहुतेक पिसांच्या टोकावर 'चंद्रकोर' किंवा 'डोळ्या'सारखा आकार असतो. साधारणपणे १७० च्या आसपास ही 'डोळेदार' पिसे असतात, तर उर्वरित पिसे बाजूला पसरलेली असतात.

Mangrove Cat Snake |हा निशाचर साप झाडावरच राहतो, डोळे असतात मांजरासारखे!