Mangrove Cat Snake |हा निशाचर साप झाडावरच राहतो, डोळे असतात मांजरासारखे!

Namdev Gharal

mangrove cat snake हा मुख्यता मँग्रुव्हच्या जंगलात आढळतो, हा झाडावरच राहणारा साप असून याचे डोळयातील बाहूली ही मांजरीच्या डोळयासारखी उभी असते त्‍यामुळे यांना कॅट स्नॅक म्हटले जाते

हा प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियातील (इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, फिलीपिन्स) मॅन्ग्रोव्ह जंगले (खारफुटी), वर्षावने आणि नद्यांच्या काठावर आढळतो.

हा पूर्णपणे निशाचर आहे. पूर्ण दिवसभर तो झाडांच्या फांद्यांवर वेटोळे घालून झोपतो आणि रात्री पक्षी, सरडे, बेडूक, उंदीर आणि इतर लहान सापांची शिकार करतो

दिसायला हा भितीदायक असतो, धोका जाणवल्यास हा साप खूप आक्रमक होतो. तो आपले शरीर 'S' आकारात वळवतो आणि तोंड उघडून जोरात फुत्कारतो

हा साप आपल्या वजनापेक्षा मोठ्या शिकारीला सहज गिळू शकतात. त्यांना Bird-eating snake असेही म्हणतात कारण झाडावर घरटी बांधून राहणारे पक्षी हे त्यांचे आवडते खाद्य आहे

हा साप गडद काळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या संपूर्ण अंगावर गडद पिवळ्या रंगाचे उभे पट्टे किंवा रिंग्ज असतात. हे पट्टे पोटाच्या बाजूने अधिक स्पष्ट दिसतात

हा 'कॅट स्नेक' प्रजातीमधील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे. याची लांबी साधारणपणे ६ ते ८ फूट पर्यंत असू शकते.

याचे आणखी वैशिष्ठ्ये म्हणजे हा साप सौम्य विषारी (Mildly Venomous) असतो. याचे विष मानवासाठी सहसा प्राणघातक नसते, परंतू चावा घेतल्यास सूज, वेदना आणि खाज सुटू शकते

ने 'न्यूरोटॉक्सिक' (Neurotoxic) प्रकारचे असते. हे विष मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम करते मानावासाठी घातक नसते पण पक्ष्यांसाठी मात्र धोकादायक ठरते

Black Mamba |जगातील सर्वात वेगवान विषारी साप, हत्तीचेही प्राण घ्येण्याची क्षमता!