पुढारी वृत्तसेवा
मोर पक्षाला भारतीय संस्कृतीत विशेष स्थान असून त्याच्या सौंदर्याबरोबरच ते ताकद, सहनशक्ती आणि बुद्धिमानतेचे प्रतीक आहे
मोर सर्वभक्षी असून तो किडे, लहान प्राणी आणि अगदी अत्यंत विषारी सापही खातो
मोर विषारी सापांची शिकार करून खातो, तरीही त्याला कोणतीही इजा होत नाही. यामागे कोणते शास्त्र ते पाहू
मोर मजबूत चोचीमुळे सापांवर हल्ला करून ठार करू शकतो. या नैसर्गिक क्षमतेमुळे तो एक कुशल साप पकडणारा पक्षी म्हणून ओळखला जातो
सापाचे विष फक्त रक्तात गेल्यावरच घातक ठरते, मोर जेव्हा सापाला खातो, तेव्हा हे विष थेट त्याच्या पचनसंस्थेत जाते, रक्तात नाही
मोराच्या पोटातील शक्तिशाली पाचक एन्झाइम्स सापाच्या विषाला इतर प्रथिनांप्रमाणेच तोडते, या प्रक्रियेमुळे विषाचा घातक परिणाम होत नाही
जखमेमार्फत विष रक्तात गेले, तर ते धोकादायक ठरते. मात्र, मोराच्या तोंडात किंवा पचनसंस्थेत जखम किंवा काप क्वचित प्रसंगी असतात
मानवांप्रमाणे मोरांना तोंडातील जखमा किंवा अंतर्गत दुखापती क्वचितच होतात त्यामुळे विष हाताळण्याची त्यांची क्षमता अधिक प्रभावी ठरते
मोराची मजबूत पचनसंस्था आणि आहारपद्धती त्यांना विषारी शिकार सुरक्षितपणे पचविण्यास मदत करते